लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पुरवठा विभागातील धान्य लाभार्थ्यांपर्यंत योग्यरितीने व वेळेत पोहचावे, यासाठी शासनाच्या वतीने आगऊ एक महिना आधी रेशन दुकानदारांना धान्य वितरित केले जाते. मात्र, बीड शहरातील गोदामामधून आगाऊ महिन्याचे १४ हजार ५०० क्ंिटल धान्य काळ््या बाजारात विक्री झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याविषयी तक्रार झाल्यानंतर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या प्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरु आहे.अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक शासकीय गोदामामधून, लाभार्थ्यांचे धान्य एक महिना अगाऊ वाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना योग्य वेळेत धान्याचे वाटप केले जात होते. परंतु बीड गोदामामधून एका महिन्याचे धान्य काळ््या बाजारात विक्री झाल्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडे व जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्या महिन्याचे आगाऊ धान्य वाटप केले नाही हे स्पष्ट होत नव्हते, याचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाºयांचे एक पथक नेमण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी अतिशय संथ गतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी सण स्वस्त धान्याविनाचबीड तालुक्यातील अनेक गावांमध्ये रेशन दुकानावरुन लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आलेले नाही. तसेच गोदामामधून नोव्हेंबर महिन्याचे धान्य रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आलेले नाही. ज्या गावामध्ये धान्य वितरित झाले आहे ते आॅक्टोबर महिन्यातील शिल्लक धान्य रेशन दुकानदारांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच गोदामामध्ये नोव्हेंबरचे वाटप न केलेले धान्य व डिसेंबर महिन्याचे धान्य असणे आवश्यक आहे. त्याची तपासणी करण्याची मागणी देखील होत आहे.
बीडच्या गोदामातील १४ हजार क्विंटल धान्य काळ््या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:25 AM