बीड : नागरिकांनी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बँक सुरू करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र बंड यांनी व्यक्त केले.
आर्वी (ता. शिरूर कासार) येथे रविवारी आयोजित केलेल्या पाणी परिषदेच्या कार्यक्रमात डॉ. बंड बोलत होते. सध्या जमिनीचा ७१ टक्के भूभाग पाण्यात आहे. त्यातील ९७.२४ टक्के पाणी खारे आहे तर, २.१४ बर्फ व हिमनद्यांच्या स्वरूपात गोठलेले आहे. मानवी वापरासाठी फक्त ०.६७ टक्के पाणी शिल्लक राहते. त्यामुळे हे लक्षात घेऊन पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावोगावी पाणी बँक स्थापन केल्या पाहिजेत. त्यातील पाण्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा वापर केला पाहिजे. भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करणे देखील गरजेचे आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील डॉ. बंड यांनी केले.
यावेळी डॉ. महादेव जगताप, डॉ. पंडित शेंडगे, प्रा. बाळासाहेब मस्के, गोवर्धन मस्के , संभाजी सुर्वे, गणेश मस्के, धनंजय मलेकर, राम साळवे, हरेराम काकडे, अमोल पाठक, ओम हिंदोळे, रमेश मदने, अभिषेक सोळंके, कैलास ओव्हाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम पार पडला.
===Photopath===
260421\26_2_bed_17_26042021_14.jpg
===Caption===
पाणी परिषेदत सहभागी झालेले वक्ते