लोकमत न्यूज नेटवर्ककडा : शाळा-महाविद्यालयीन मुलीची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना दामिनी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र त्याकडे अंभोरा पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे ठाणे हद्दीत सध्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या छेडछाडीच्या प्रकाराला आळा घालावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष भागचंद झांजे यांनी केली आहे.आष्टी तालुक्यातील आष्टी, अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत अनेक शाळा, महाविद्यालय खाजगी क्लासेस याचा समावेश आहे. त्यातच आष्टी, कडा, दौलावडगाव, धानोरा, वाघळुज, धामणगाव, घाटापिंपरी, देवळाली, दादेगाव, देऊळगाव घाट, सावरगाव यासह अनेक ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खाजगी क्लासेस आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या मुलीना येताना, जाताना, रोडरोमिओच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने मोठा मनस्ताप मुलीना सहन करण्याची वेळ आली आहे.पोलीस अधीक्षक यांनी दामिनी पथक स्थापन करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थिनींना सुरक्षिता प्रदान करावी, अशी मागणी झांजे यानी केली आहे.पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार येथे दामिनी पथक स्थापन करण्यात आले तर अशा प्रकरणांना आळा बसून विद्यार्थिनींना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेणे सोपे होईल, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी मागणी शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह पालकांनी पोलीस कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कारवाईत कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आष्टी परिसरात छेडछाडीचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:10 AM
शाळा-महाविद्यालयीन मुलीची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ठाणे प्रमुखांना दामिनी पथकाची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ठळक मुद्देमहिला, विद्यार्थिनी त्रस्त : दामिनी पथक स्थापन करण्याची मागणी