कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थी प्रति व्यक्तीस तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मे व जूनमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य, तसेच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती पाच किलो धान्य (तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ) मे या एका महिन्यासाठी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य मिळणार नसून दरमाहप्रमाणे मिळणारे धान्यच मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने कळविले आहे.
१० मे नंतर मे महिन्याचे धान्य वाटप होणार आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वस्त धान्य दुकानदार यांचा अंगठा लावून धान्य वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस मशिनवर या महिन्यात अंगठा घेण्याची आवश्यकता नाही. धान्य वाटप करताना दुकानदार व लाभार्थी यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, आदी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी कोविड-१९ चे सर्व नियम पाळून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष सय्यद शाकेर, तहसीलदार वंदना शिडोळकर व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे
शेतकरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य मिळणार नसून दरमाहप्रमाणे मिळणारे धान्यच मिळणार असल्याचे पुरवठा विभागाने कळविले आहे. मे महिन्याचे धान्य वाटप होणार आहे. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वस्त धान्य दुकानदार यांचा अंगठा लावून धान्य वाटप करण्यात येणार आहे. ई-पॉस मशीनवर या महिन्यात अंगठा घेण्याची आवश्यकता नाही. धान्य वाटप करताना दुकानदार व लाभार्थी यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, आदी कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी कोविड-१९ चे सर्व नियम पाळून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, शहर दक्षता समितीचे अध्यक्ष सय्यद शाकेर तहसीलदार वंदना शिडोळकर व नायबतहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले आहे.