लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला भाव द्या, या मागणीसाठी एक ते दीड महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरु आहे, परंतु साखर कारखानदार याला कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी थेट फडात जाऊन ऊसतोड बंद आंदोलन करण्यास सुरु वात केली आहे.
येथील बाजार समिती आवारात बोलावलेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.ऊस उत्पादक शेतकरी हे मागील दीड महिन्यापासून विविध आंदोलने करीत उसाला २ हजार ६०० रूपयांप्रमाणे पहिली उचल देवून ३ हजार ५०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी करीत आहेत. मात्र या मागणीला कारखानदार कसलाच प्रतिसाद देत नाहीत. दरम्यानच्या काळात प्रशासनाने दखल घेवून बैठकीतून हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कारखानदार हे २ हजार रुपयांच्यावर भाव द्यायला काही केल्या तयार नाहीत. त्यामुळे हा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील भावासंदर्भात वादामुळे मागील अनेक दिवसांपासून प्रत्येकवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार मागणी करुन देखील प्रशासन अथवा कारखानदार दखल घेत नाहीत, असे पाहून आता ऊस उत्पादक शेतकºयांनी पक्ष विरहित ऊसतोड बंदी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेवून तो लगेचच अंमलात आणण्याचे जाहीर केले.
बाजार समिती आवारात बोलावण्यात आलेल्या बैठकीला गंगाभिषण थावरे, नितीन नाईकनवरे, धम्मानंद साळवे, नारायण गोले, डॉ. उध्दव नाईकनवरे, बबनराव सोळंके, हनुमान कदम, नारायण होके, राजेंद्र होके, नाना घाटुळ, पापा सोळंके, नुमान चाऊस, राजाभाउ शेजूळ, विकास कदम, रामचंद्र डोईजड यांच्यासह विविध सामाजिक राजकीय पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकºयांचा सहभाग होता.आमदारांच्या घरावर
शुक्र वारी मोर्चाबैठकीत आमदार देशमुख यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषण करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना भाव मिळवून द्यावा, या मागणीसाठी आ.आर.टी. देशमुख यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याच थावरे यांनी सांगितले.