बीड, दि. ९ : पाटोदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 34 ग्रामपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत . थेट सरपंच निवड प्रक्रियेत तिन सरपंच बिनविरोध निवडून आले . एक सरपंच केवळ एका मताने निवडून आला . तर महासांगवी येथे स्थानिक राजकीय कुरघोडीमधे तिन सदस्याच्या जागा रिक्त राहिल्या.
> निवड झालेले सरपंच असे ,
कुसळंब - रोहिणी सतीश पवार , अंतापूर - भाऊसाहेब बाजीराव गाडे (एक मताच्या मताधिक्याने निवडून आले .) बेनसुर - सगरे शारदा राजाभाऊ , पाचेगाव - गिरे रमेश वसंतराव , पाचंग्री - भोरे संजय साहेबराव , चिखली - सुरवसे रामराव बाबा , निवडूंगा - मिसाळ भागवत रामचंद्र , चिंचोली - सांगळे श्रीधर उत्तमराव कोतन - खेंगरे महेश साईनाथ अंमळनेर - पवार लक्ष्मीबाई रामा (बिनविरोध )येवलवाडी - अनिता बबन पवार गवळवाडी - लंकाबाई आप्पाजी घोळवे पारनेर - अर्चना संतोष नेहरकर डोंगरकिन्ही - सरूबाई हौसराव रायते सोनेगाव - काशीबाई सोपान वाघमारे पीठ्ठी - राधाकिसन भानुदास तुपेडोमरी - नारायण धोंडीबा भोंडवे नायगाव - सय्यद अस्मा शाहिद सौताडा - छाया नवनाथ सानप तळे पिंपळगाव - बाळकृष्ण पंढरीनाथ चौरेकरंजवन - सुनीता भागवत खाडेजवळाला - तारामती श्रीहरी कोठूळेपांढरवाडी - चांगदेव यादव इथापे (बिनविरोध )पिंपळवंडी - मनिषा ज्ञानेश्वर पवार लांबरवाडी - केराबाई आनंदा लांबरुड (सर्व सदस्यही बिनविरोध )सावरगाव घाट - रामचंद्र दुधाबा सानप सावरगाव सोने - भीमा भाऊराव सोनवने थेरला - मिनाबाई राजेंद्र गायकवाड भायाळा- विजयसिंह रामकृष्ण बांगर (केवळ 14 मताधिक्याने विजयी )नाळवंडी - सोजरबाई पन्हाळकर कारेगाव - मुस्तफा बाबा शेख महासांगवी - सुभाष मारुती अडागळे (येथे तिन सदस्याच्या जागा रिक्त आहेत )नफरवाडी - बाबासाहेब बंडू सवासे येवलवाडी (पा)- राजूबाई रामचंद्र नागरगोजे