लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील नगर नाक्यावर सोमवारी मध्यरात्री झालेली लुटमार ही केवळ गांजा पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या १० तासांत छडा लावून दोघांना गजाआड केले होते. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.विकी राजू कांबळे (२५ रा.राजुरीवेस, बीड) व सुयोग मच्छिंद्र प्रधान (१८ रा.साईपॅलेसच्या पाठिमागे, बीड) असे पकडलेल्या दोन चोरट्यांची नावे आहेत. दोघेही गांजा पिण्याच्या सवयीचे आहेत. सोमवारी मध्यरात्री ते नगर रोडने ठरलेल्या अड्डयावर गांजा पिण्यासाठी जात होते. एवढ्यात नगर नाक्यावर त्यांना दिलीप बाजीराव सुरासे (रा. खोकडपुरा, औरंगाबाद) हे कारजवळ फोनवर बोलताना दिसले. तब्बल एक तास सुरासे हे नाक्यावर होते. त्यांन आजुबाजूला कोणी नसल्याची संधी साधून त्यांच्या कारमधील एक व हातातील एक असे दोन मोबाईल हिसकावून घेतले. तसेच खिशातील रोख १० हजार रूपये घेऊन त्यांनी पळ काढला. या प्रकरणाचा दरोडा प्रतिबंधक पथकाने अवघ्या दहा तासांत छडा लावला होता.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या मार्गदर्शनाखली पोउपनि आर. ए. सागडे तपास करीत आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, विकी व सुयोग हे दोघेही मित्र आहेत. दोघांनाही गांजा ओढल्याशिवाय चैन पडत नव्हती. नगर रोडवरील एका ठरलेल्या ठिकाणी त्यांची रोज रात्री बैठक होत असे. सोमवारी त्यांच्याजवळचे पैसे संपले होते. आता दुसऱ्या दिवशी गांजा ओढायचा कसा? याची चिंता त्यांना होती. यातूनच त्यांनी नजर ठेवून सुरासे यांना लुटल्याचे त्यांनी कबुल केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. केवळ व्यसनापायी त्यांनी हा गुन्हा केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तपास अधिकारी आर.ए.सागडे यांनी दोघांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
गांजाच्या एका झुरक्यासाठी त्यांनी कारचालकाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:29 AM
शहरातील नगर नाक्यावर सोमवारी मध्यरात्री झालेली लुटमार ही केवळ गांजा पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून चोरट्यांनी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या १० तासांत छडा लावून दोघांना गजाआड केले होते. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
ठळक मुद्देबीडमधील प्रकार : दोन्ही चोरट्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी