गेवराई : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक बिर्याणी हाॅटेल, एक देशी दारूचे दुकान तसेच दोन पान सेंटर फोडून तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ब्रेक द चेनचे निर्बंध व रात्रीची संचारबंदी असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या मुस्ताक कुरेशी यांच्या सिटी बिर्याणी हाॅटेलच्या मागील पत्र्याचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी उचकटून हाॅटेलमध्ये प्रवेश करून आतील एल.सी.डी. टीव्ही, एक मोबाईल तसेच गल्ल्यातील नगदी ७ हजार रुपये असा ५५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच बाजूला असलेले सवेरा पान सेंटर फोडून आतील १५ हजारांचे साहित्य चोरून नेले. तसेच बाजूला असलेले अजून एक पान सेंटर फोडून माल लंपास केला. लगतच असलेल्या बाबासाहेब घुंबार्डे यांच्या देशी दारू दुकानाचा पत्रा तोडून आतील ५५ हजार रुपये किमतीचे देशी दारूचे २० बॉक्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. गेवराईत पत्रा उचकटून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेलमध्ये प्रवेश करून चोरी केली.
===Photopath===
130421\20210413_133323_14.jpg