शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

दर वाढल्याने चोरट्यांचा मोर्चा इंधनाकडे; महिनाभरात उभ्या ट्रकमधून २७ लाखांचे डिझेल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 6:43 PM

मालवाहू वाहने उभी करून मध्यरात्रीनंतर चालक विश्रांती घेतात. त्याचा फायदा घेत उभ्या वाहनांजवळ जीप उभी करून करायचे डीझेल चोरी

बीड: इंधन दराचा भडका उडाल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा डिझेल चोरीकडे वळविला आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी जालन्यातून पकडलेल्या मध्यप्रदेशच्या टोळीने महिनाभरात २७ लाख रुपयांचे डिझेल लंपास केल्याची माहिती आहे. जीपला बनावट क्रमांक असलेली पाटी लावायची, त्यात बसून जायचे अन पेट्रोलपंप, टोलनाक्यांवर उभ्या वाहनांतील डिझेल काढून धूम ठोकायची अशा पद्धतीने टोळीने बीडसह जालना व औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

नामलगाव फाटा येथील पेट्रोल पंपाच्या परिसरात उभ्या असलेल्या पाच वाहनांतील एक लाख रुपयांचे ११०० लिटर डिझेल चोरट्यांनी लंपास केल्याची बाब ८ फेब्रुवारी २०२२ रोजी उघडकीस आली. बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पाडळसिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जीपसह एक कार अशी तीन वाहने संशयास्पद आढळली. या क्ल्यूवरून पोलिसांनी तपासचक्रे फिरवून सय्यद मुक्तार सय्यद करीम (४४, रा. लक्कडकोट, जालना), खेमचंद तुलसीराम जाटो (३४, रा. लक्ष्मीपूर, जि. साजापूर, मध्य प्रदेश), शौकत मजीद मेव (३६), अनिल कुमार बाबूलाल (३६), हाफिज कासम खॉ (२८), अशोक नजीर चावरे (३०, सर्व रा. दुपाडा, मोहर बडोपिया, जि. साजापूर, मध्य प्रदेश) व आवेश खान दादे खान (३२, रा. नाहदी कॉलनी, मिल्लत नगर, जालना) या सात जणांना उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या पथकाने जालना येथील चंदनझिरा परिसरातून अटक केली. त्यांनी एकूण आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून दोन जीप, एक दुचाकीसह डिझेल भरलेले व रिकामे कॅन असा सुमारे ६ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आधी रेकी अन् नंतर उघडायचे टाकीमालवाहू वाहने उभी करून मध्यरात्रीनंतर चालक विश्रांती घेतात. त्याचा फायदा घेत उभ्या वाहनांजवळ जीप उभी करून रेकी करायचे, त्यानंतर टाकीचे कुलूप कटावणीने तोडून पाईपने इंधन काढून कॅनमधून भरायचे. कॅन जीपमध्ये टाकून आरामात निघून यायचे. चोरटे सोबत दगड व लोखंडी राॅडही ठेवत असत.

गुन्ह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे शिवाय एक कार जप्त करणे बाकी आहे. या टोळीने बहुतांश गुन्हे पहाटे दोन ते चार या वेळेत केल्याचे उघड झाले आहे.- संतोष साबळे , पोलीस निरीक्षक, बीड ग्रामीण ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडFuel Hikeइंधन दरवाढ