शाळेत आल्यावर कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे मुख्यध्यापक रघुनाथ नागरगोजे यांनी गावातील नागरिक राहुल भारती,बंडू माने व ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांनी ऑफिस उघडून पाहणी केली असता शाळेतील कुठलेही साहित्य चोरी गेले नसल्याचे दिसून आले. यापूर्वी देखील शाळेतील टीव्हीची चोरी झाली होती. त्याची तक्रार देऊनही चकलांबा पोलीस ठाण्याकडून तपास लागलेला नाही. त्यानंतरही शाळेचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. याचीही तक्रार चकलांबा पोलीस ठाण्यात दिली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा कुलूप तोडले आहे. पुढील काळात शाळेतील कागदपत्रे व मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापक व शालेय समितीने रीतसर तक्रार मंगळवार रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात दिली असून तपास चकलांबा ठाण्याचे कर्मचारी काकडे करत आहेत.
140721\sakharam shinde_img-20210714-wa0050_14.jpg