बीड : दुधाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले दूध पुरवठा बंद आंदोलन जिल्ह्यात तिसºया दिवशीही सुरुच होते. अपेक्षित २ लाख लिटरपैकी एकूण २४ हजार २५५ लिटर दुधाचे संकलन झाले. दोन दिवस आंदोलनानंतर तिसºया दिवशी सहकारी दूध संघ आणि खाजगी डेअरीत दुधाचे काही प्रमाणात संकलन करण्यात आले.
जिल्ह्यात शासनामार्फत संकलित करण्यात येणाºया एकमेव अंबाजोगाई येथील दूध शीतकरण केंद्रात बुधवारी १६ हजार लिटर दूध संकलन झाले. या केंद्रात अंबाजोगाई आणि परळी तालुका संघामार्फत दूध संकलन होते. संकलित दूध नियोजनाप्रमाणे भूम व उदगीर येथील डेअºयांना पोलीस बंदोबस्तामध्ये पाठविण्यात आले.
बीड जिल्हा सहकारी दूध संघ तसेच गेवराई तालुका संघात संकलन झाले नाही. बीड तालुका दूध संघात मात्र १ हजार ५५ लिटर तर आष्टी तालुका सहकारी दूध संघात ४ हजार २०० लिटर संकलन झाले. खाजगी दूध डेअरींचे जवळपास ५० हजार लिटर अपेक्षित असताना ३ हजार लिटर संकलन झाले. जिल्ह्यात शासकीय, सहकारी दूध संघ तसेच खाजगी डेअरींचे मिळून २४ हजार २५५ लिटर दूध संकलन झाले.
बुधवारी सकाळी चिंचाळा, देसूर, बेलगाव, शिंदेवाडी, केळसांगवी येथील दूध उत्पादक शेतकºयांनी दुधाने आंघोळ करून अहमदनगर - बीड मार्गावर दूध ओतून शासनाचा निषेध केला. यावेळी चेअरमन सुनील पोकळे, अशोक पोकळे, भाऊसाहेब घुले, बाळासाहेब पोकळे, पंडित पोकळे, डॉ. जानदेव साळुंके, सरपंच डिगांबर पोकळे, दत्तात्रय पोकळे, गोरख तोडकर, मनोज तांबे आदी दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.आज जिल्हाभर चक्का जाम आंदोलनदूध संकलन व बंद आंदोलनाच्या चौथ्या दिवशी खा. राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यात प्रमुख महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, युवा जिल्हाध्यक्ष राजू गायके, धनंजय मुळे, रोहिदास चव्हाण, प्रमोद पांचाळ, राजेंद्र डाके पाटील, ज्योत्सना खोड आदींनी केले आहे. गाई, म्हशी, बैल, शेळ्या आदी जनावरे, बैलगाडी आदी प्राणी व शेती साहित्यासह सहभागी होण्याचे आवाहन अश्विनी सपकाळ, मच्छिंद्र गावडे, भाऊसाहेब घुगे, नितीन लाटे, अर्जुन सोनवणे, विकास चव्हाण, अण्णा शेळके, वशिष्ट बेडके, चंद्रकांत अंबाड, विश्वास जाधव, मधुकर पांडे, महादेव वाघमारे, सचिन डोरले, बाळसाहेब जायभाय, घन:शाम पांडुळे, रणजित विघ्ने आदींनी केले आहे.
आंदोलकांवर गुन्हे दाखलगुजरातमधून दूध वाहतूक करणारे गुजरातचे टॅँकर (जि.जे ०९ ए.व्ही ९६८८) अडवून, घोषणाबाजी करत दूध रस्त्यावर ओतले व लोकांना वाटप करुन नुकसान केल्याप्रकरणी टॅँकर चालक अल्ताफ अली असफअली सय्यद याच्या फिर्यादीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू गायके व गेवराईच्या पं. स. सदस्य पूजा मोरे तसेच इतर दोघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक ठोंबरे करत आहे.