शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

माजलगाववर राहणार तिसऱ्या डोळ्यांची नजर; महत्वाच्या ४६ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 3:45 PM

शहरातील ४६ ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तीन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी निधी राखुन ठेवण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीतून पतसंस्था - मल्टीस्टेट संघटनेचा पुढाकार

माजलगाव : शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीतून येथील सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ४६ महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे शहरात होणाऱ्या चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार यासह महत्त्वाच्या घटना घडामोडींवर सीसीटीव्हीचे बारीक लक्ष राहणार आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शहरातील चोऱ्या, छेडछाडीचे, भांडण आदीसह गुन्हेगारी घटनांसह इतर  बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी माजलगाव शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार आहे. या कार्यासाठी सामाजिक बांधिलकीतून येथील सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांच्यासमोर गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव मांडला होता.त्या अनुषंगाने गुरुवारी पतसंस्था मल्टीस्टेट पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय मान्य करण्यात आला आहे.

त्यानुसार शहरातील महत्त्वाची ठिकाणे असणारी संभाजी चौक, रंगोली कॉर्नर, शिवाजी चौक, नरवडे कॉम्प्लेक्स,आंबेडकर चौक, करवा पेट्रोल पंप, आझाद चौक, हनुमान चौक, परभणी टी पॉइंट, सिद्धेश्वर शाळा - महाविद्यालय, सुंदरराव सोळंके महाविद्यालया समोरील परिसर आदी 46 महत्त्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाच्या कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. सदरील कॅमेरे 4  मेगापिक्सल एचडी हाय डेफिनेशन, नाईट व्हिजन आहेत. त्याबरोबर सदरील कॅमेरे कॉर्डलेस असून त्यांना डिश अँटिना आहे.ज्यामुळे या कॅमेऱ्याना ऊन पाऊस वारा यातून बिघाड होण्याची संभावना नसल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण शहर पोलिसांकडे राहणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार आहे.

३ वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च राखीवशहरातील ४६ ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तीन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी निधी राखुन ठेवण्यात आला आहे. 

नगरसेवकांनी वार्डात सीसीटीव्ही बसवावेतशहरात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवले जाणार आहेत. वार्डातील गल्ली बोळात ही सीसीटीव्ही बसवले तर गुन्हेगारीवर आळा बसेल. त्यामुळे प्रत्येक वार्डातील नगरसेवकांनी वार्डात सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Beedबीडcctvसीसीटीव्हीCrime Newsगुन्हेगारी