अविनाश कदम।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, कापूस, ज्वारी या पिकांबरोबरच डाळिंब, लिंबाच्या बाग जळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्यातील मेहेकरी व कढाणी धरणात अल्प प्रमाणात पाणीसाठा असून इतर छोटे मोठे धरण कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे आष्टी तालुक्यात पाणी टंचाईबरोबरच चारा टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने टँकरबरोबरच गुरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. आष्टी पंचायत समितीत ७६ टँकरचे प्रस्ताव दाखल आहेत. पुढील पाणी टंचाई कमी करण्यासाठी कुकडीचे पाणी मेहकरी धरणात सोडल्यास याचा तालुक्याला फायदा होईल व येथून टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे सोपे जाऊन शासनाचे लाखो रूपयांची बचत होऊ शकते.पंचायत समितीमध्ये ७६ टँकरचे प्रस्ताव दाखलसध्या आष्टी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातून आजपर्यंत टँकर चालू करण्यासाठी एकूण ७६ प्रस्ताव दाखल आहेत. त्यापैकी २० टँकर मंजूर करण्यात आले आहे. हे पुढील प्रमाणे लोणी सय्यदमीर, पारगाव जोगेश्वरी, शेडाळा, चिंचोली, सांगवी (आ), काकडवाडी, अरणविहिरा, खरडगव्हाण, पांगरा, कोयाळ, चिखली, खडकत, टाकळसिंग, हिंगणी या गावांत टँकर सुरु झाले असून, उर्वरित ६२ प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविले आहेत.टँकरने पाणीपुरवठा करत असलेल्या गावात दरडोई २० लिटर पाणी देत असल्याची माहिती गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
हिवाळ्यातच वाढली तहान; फळबागा झाल्या बकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:47 AM
निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी आष्टी तालुक्यात अपेक्षित पाऊस पडला नसल्याने पाणीपातळीत वाढ झालेली नाही. अल्पशा पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची पिके पाण्याअभावी वाया गेली. ऊस, कापूस, ज्वारी या पिकांबरोबरच डाळिंब, लिंबाच्या बाग जळू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
ठळक मुद्दे२० टँकर सुरू : आष्टी पंचायत समितीत टँकरचे ७६ प्रस्ताव दाखल; पाणी व चारा टंचाईवर तातडीने उपायांची गरज