शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

याला म्हणतात लढत! नाथऱ्यात मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले तरी एका अपक्षाने बाजी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:59 PM

मुंडे यांचे गाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व  सरपंचपदाची निवडणूक झाली होती. 

परळी (बीड) : तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आ. धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंच म्हणून 635 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश मुंडे यांचा पराभव केला आहे. प्रकाश मुंडे हे सरपंच पदासाठी पराभूत झाले असले तरी त्यांच्या पत्नी गीता मुंडे या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले होते. सरपंचपद आणि एक जागा सोडता सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. 

परळी तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सदस्यपदाच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक- २ मधून अपक्ष उमेदवार गीता प्रकाश मुंडे या 20 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार  दिव्या अंगद मुंडे यांचा पराभव केला. गीता प्रकाश मुंडे यांना 229 मते मिळाली तर दिव्या अंगद मुंडे यांना 209 मते मिळाली आहेत. गीता प्रकाश मुंडे या अपक्ष तर दिव्या अंगद मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप समर्थकांच्या उमेदवार होत्या. तर अपक्ष गीता मुंडे यांचे पती प्रकाश मुंडे हे सरपंचपदासाठी मुंडे बहिण-भाऊ यांचे चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विरोधात उभे होते. प्रकाश मुंडे यांना सरपंच पदासाठी 214 मते मिळाली, तर अभय मुंडे यांना 849 मते मिळाली आहेत. अभय मुंडे हे सरपंच पदी निवडून आले. सरपंच पदाचे उमेदवार गौतम आदमाने यांना 189, रमेश मुंडे यांना 28 तर नोटाला 9 मते मिळाली. नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व  सरपंचपदाची निवडणूक झाली होती. 

बेरोजगारांसाठी लढवली निवडणूकनाथरा गावातील 100 बेरोजगार असून त्या पैकी 20  बेरोजगाराना रोजगार मिळावा ही आपली मागणी होती. विरोधासाठी विरोध म्हणून निवडणूक लढविली नाही. तर बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आपण सरपंच पदाची व पत्नीने सदस्यपदाची निवडणूक लढविली. आपला पराभव झाला पण पत्नीच्या विजयाचा आनंद आहे.- प्रकाश मुंडे, अपक्ष उमेदवार, नाथरा

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडgram panchayatग्राम पंचायत