शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

मुंडे समर्थकांची मांदियाळी; समाधीस्थळाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 3:58 AM

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मेळाव्याला उपस्थिती

बीड : पांगरी येथील गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच हजारो कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.

पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अमर रहे घोषणा दिल्या. चंद्रकांत पाटील यांचा व्यासपीठावर उल्लेख होताच काही कार्यकर्त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पंकजा यांनी माईक हाती घेऊन त्यांना शांत केले. एकनाथ खडसे यांच्या भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या मिळाल्या.

आमची नियत साफ : जानकर

आम्ही मुंडे साहेबांपासून सोबत आहोत. महायुतीतीलही घटक पक्ष आहोत. आमची नियत साफ आहे. बारामतीची पालखी वाहणारे आम्ही नाहीत, असे जानकर म्हणाले. मुंडे साहेबांप्रमाणेच पंकजा यांच्या पाठीशीही आम्ही भक्कमपणे उभे आहोत. पक्षाकडून त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. तुम्ही लक्ष द्या, असे आवाहन जानकर यांनी चंद्रकांत पाटील यांना केले.मला गृहीत धरू नका - एकनाथ खडसे

भाजप नेते एकनाथ खडसे यांचा भाषणाचा सूर सुरुवातीपासूनच आक्रमक होता. त्यांनी पक्षश्रेष्ठींवर घणाघात केला. खडसे म्हणाले, एकेकाळी भाजपमध्ये गोपीनाथराव मुंडे यांना अपमानास्पद वागणूक दिली तोच प्रकार आज माझ्याबाबतीत घडत आहे. गोपीनाथरावांनी आणीबाणीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत भाजपची ओळख सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून करुन दिली.

कार्यकर्ता, नेते घडविले. कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. मुंडे यांनी आयुष्यभर पक्षासाठी संघर्ष केला. परंतु त्यांच्या वाट्यालाही पक्षात दु:खच आले. आज माझ्याबाबतीत घडत आहे. आजचे भाजपमधील चित्र महाराष्ट्राला मान्य नाही. गोडगोड बोलून पाडायचे, ही नीती राबवली जात आहे. माझ्याप्रमाणेच पंकजा यांनाही परळीत हा अनुभव आला.

कार्यकर्ता, नेते घडविले. कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. मुंडे यांनी आयुष्यभर पक्षासाठी संघर्ष केला. परंतु त्यांच्या वाट्यालाही पक्षात दु:खच आले. आज माझ्याबाबतीत घडत आहे. आजचे भाजपमधील चित्र महाराष्ट्राला मान्य नाही. गोडगोड बोलून पाडायचे, ही नीती राबवली जात आहे. माझ्याप्रमाणेच पंकजा यांनाही परळीत हा अनुभव आला. आपल्याच माणसांनी पाडण्याचे पाप केले.

किती दिवस सहन करणार? पंकजा भाजप सोडणार नाहीत परंतु माझा मात्र भरोसा धरू नका. ४० वर्षे पक्षात काम करणारे आज का गुदमरत आहेत? पक्ष सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. मुंडे साहेबांनी मोठ्या मनाने माणसे घडविली. आज तसे घडत नाही, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.

चुका माणसाकडून झाल्या, पक्षावर राग कशासाठी? - चंद्रकांत पाटील

व्यथा, दु:ख व्यक्त झाले पाहिजे. त्याची दखलही घेतली पाहिजे. चुका माणसाकडून झाल्या, त्याचा पक्षावर राग कशासाठी? बोलण्यातून एकमेकांना जखमा करू नका. घरातले भांडण घरातच मिटले पाहिजे, ते रस्त्यावर यायला नको, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराज नेत्यांची समजूत घातली.

नाराजांचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने होता. खडसे यांनी तर अपमानास्पद वागुणकीबद्दल श्रेष्ठींवरही टीका केली होती. या भाषणाचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, पक्ष कुठलाही असो थोडीफार नाराजी, तक्रारी असतातच. त्या व्यक्तही झाल्या पाहिजेत. या चुका व्यक्तींच्या असतात, पक्षाच्या नसतात. तेव्हा व्यथा मांडताना देखील शब्द जपून वापरले पाहिजेत. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर आपण जे काही बोललो असतो, त्याचाच आपणास पश्चाताप होईल. बदल हा होतच असतो. त्यात नवीन पक्षाची भाषा कशाला?यावेळी बबनराव लोणीकर, हरिभाऊ बागडे यांचेही भाषण झाले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटील