शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

खटला मागे घेण्यासाठी तलवार दाखवून दमबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:15 AM

दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी एकाच्या सांगण्यावरून १८ जणांनी एका मजुराच्या घरात घुसून तलवारीचा धाक दाखवत दमबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी एकाच्या सांगण्यावरून १८ जणांनी एका मजुराच्या घरात घुसून तलवारीचा धाक दाखवत दमबाजी केली. यावेळी मजुराला शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री बीड शहरातील खडकपुरा भागात घडली. या घटनेनंतर पेठ बीड पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत एका व्यक्तीकडे तलवार आणि एकाकडे खंजीर आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावरही स्वतंत्र गुन्हे दाखल केले.खडकपुरा भागात राहणाऱ्या मनोहर उर्फ मनोज लक्ष्मण गोडसे याने बाळू गुंजाळ याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. शुक्रवारी बाळूचा वाढदिवस असल्याने गल्लीतील मुलांनी चौकात डीजे वाजवत त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यांनतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गल्लीतील आत्माराम उर्फ अंबादास तुकाराम गुंजाळ, योगेश आत्माराम गुंजाळ, दत्ता शहादेव जाधव, नितीन विलासराव गरड, अमोल लोंढे, सुजीत अशोक गुंजाळ आणि अन्य १० ते १२ जण गोडसे यांच्या घरात घुसले. त्यांच्यापैकी योगेश गुंजाळ व अमोल लोंढे यांच्या हातात तलवार होती. आम्हाला बाळू गुंजाळ याने पाठविले असून ‘तू त्याच्यावर दाखल केलेला खटला मागे का घेत नाहीस’ असे म्हणत तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच शिवीगाळ केली. यावेळी वीट लागल्याने गोडसे किरकोळ जखमी झाले. गोडसे यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १८ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.झाडाझडतीत जप्त केली तलवारया घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या सूचनेनुसार पेठ बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. उदावंत, कर्मचारी प्रेमदास साळवे, जाधव, अलगट, सानप, महिला पोलीस सोनवणे शहरातील विविध भागात जाऊन झाडाझडती घेत अवैधरित्या शस्त्र बाळगणा-यांवर कारवाई केली. रात्री ११.२५ वाजता नाळवंडी रोड येथे राहणाºया धर्मराज उर्फ बाळासाहेब लक्ष्मण गुंजाळ याच्या घरी पोलीस झडतीसाठी गेले असता त्याने विरोध केला. त्याचा विरोध झुगारून पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना दरवाजामागे एक तलवार लपवून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त केली असून गुंजाळवर शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.खंजीर बाळगणा-यावर गुन्हाकंबरेला खंजीरसारखे घातक शास्त्र लावून एक इसम दुचाकीवरुन (एमएच २० डीएक्स ४६१७) पेठ बीड हद्दीत फिरत असल्याची माहिती गस्त पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश जगताप आणि कापले यांनी रात्री ११.१५ वाजता रविवार पेठेत जाऊन सदरील इसमास हटकले. चौकशी दरम्यान त्याने स्वत:चे नाव शहजादखान उमरखान पठाण (वय २८ वर्षे, रा. ख्वाजानगर, खासबाग, बीड) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला खंजीर आढळून आला. पोलिसांनी शहजादखानला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा नोंदविला असून खंजीर आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय