घरफोड्या करणारा आरोपी अनिल उर्फ अजय मनोहर शिंदे (रा. शेलीबाजार, निलंगा, जि.लातूर व हल्ली मुक्काम बार्शीनाका बीड) याला कळंब येथून अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केली असता चोरीचा एक मोबाईल मिळून आला. या मोबाईल चोरीसंदर्भात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच अनिल शिंदे याने दिड महिन्यापुर्वी वडवणी तालुक्यात पिंपरखेड येथे एरीयल शिंदे, बोबीन मोतीराम शिंदे यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोबीन शिंदे व एरीयल शिंदे या दोघांना अटक केली. तिन्ही आरोपींना वडवणी पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रमुख पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या पथकाने केली.
आणखी गुन्हे उघडकीस येणार
आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील चोऱ्या व घरफोडीच्या गुन्ह्यात या आरोपींचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून, तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.