बीड : परळी विधानसभा मतदार संघातून मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात पत्नीसह पाच अपत्य अवलंबित असल्याचे नमुद केले आहे. तर २०१९ च्या शपथपत्रात त्यांनी पत्नीसह तीन अपत्ये असल्याचा उल्लेख केला होता.
विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी संपत्ती, अवलंबीत व्यक्ती, गुन्हे आदींची माहिती भरून शपथपत्र निवडणूक विभागाला देणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील ४०९ उमेदवारांनी ५६६ अर्ज दाखल केले होते. यातील ३३ उमेदवारांचे ६१ अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले आहेत. यामध्ये प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाले नाहीत. परंतु आयोगाला दिलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी पाच अपत्ये दाखवली आहेत. २०१९ च्या शपथपत्रात मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे, वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे आणि आदिश्री मुंडे या तीन अपत्यांचा उल्लेख केलेला आहे. आता २०२४ च्या शपथपत्रात त्यांनी पाच अपत्यांचा उल्लेख केला असून यामध्ये सिशीव मुंडे आणि शिवानी मुंडे यांची नावे वाढवली आहेत.
धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेल्या अपत्यांची नावेनिवडणूक २०२४ :शिवानी मुंडेसीशिव मुंडेवैष्णवी मुंडेजान्हवी मुंडेआदीश्री मुंडे
निवडणूक २०१९ :वैष्णवी मुंडेजान्हवी मुंडेआदीश्री मुंडे