शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
6
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
7
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
8
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
9
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
10
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
11
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
12
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
13
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
14
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
15
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
16
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
17
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
18
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
19
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
20
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

उपमुख्यमंत्री पवारांची सभा संपून तीन दिवस झाले, स्वागताचे बॅनर काढताना युवकाने प्राण गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 4:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

माजलगाव ( बीड) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांची  जनसन्मान यात्रा माजलगावात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या निमित्त अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरातील मुख्य रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना लावण्यात आले होते. यातीलच धरणाच्या कमानीजवळ  लावलेले एक बॅनर काढताना वीज वाहक तारेला बॅनरचा स्पर्श होऊन गौतम सरपते ( रा.केसापुरी ) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार रोजी रात्री ११ वाजता घडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वागताचे बॅनर सिंदफणा नदी पात्र ते केसापुरी कॅम्पपर्यंत लावले होते. ५ किमीपर्यंत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरातून चालणे मुश्किल झाले होते. या लावण्यात आलेल्या बॅनरला माजलगाव नगरपालिका व राष्ट्रीय महामार्गाकडून कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती.

दरम्यान, बाजारसमितीचे सभापती यांनी धरणाच्या कमानीजवळ त्यांचे स्वतःचे बॅनर लावले होते. हे बॅनर देखील विनापरवानगी लावण्यात आले होते. बुधवारी रात्री अकरा वाजता हे बॅनर काढत असताना बॅनरचा स्पर्श वीज वाहक तारेस झाल्याने विजेचा धक्का बसून गौतम हरपते ( २५ ) या युवक कोसळला. त्याला खाजगी रुग्णालयास उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

गुन्हा दाखल, तरी बॅनर जागेवरउपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम होऊन ३ दिवस झाले. तरी रस्त्यावर लावलेले अनधिकृत कटआउट, बॅनर अद्याप तसेच आहेत. हे काढत असताना युवकाचा मृत्यू झाला. जनसन्मान यात्रेच्या आयोजकांना याचे कसले सोयर सुतक नसल्याचे दिसून आले. चार दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले. मात्र, रस्त्यावर जागोजागी अडथळा निर्माण करणाऱ्या या कट आउट बॅनर अद्याप काढलेले नाही.

लोकमतने छापले होते वृत्त अजित पवार यांच्या स्वागतासाठी विनापरवाना मुख्य रस्त्यावर होल्डिंग व बॅनर लावण्यात आले होते. त्याचबरोबर कार्यक्रम स्थळी चोरून विजेचा वापर केला जात होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर डीपीवर टाकण्यात आलेले आकडे काढण्यात आले. परंतु हे बॅनर न काढल्यामुळे एका युवकाचा बळी गेला.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात