बीड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांकडून पाणी साठ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी या सूचना दिल्या.चालू वर्षाच्या पावसाळ्यात सुरु वातीला कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. बीड शहराला आठ दिवसाआड तर काही ठिकाणी दहा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. परंतु परतीच्या पावसाने बिंदुसरा धरणात ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. माजलगाव धरणात जवळपास ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून शहरासाठी ११ जलकुंभाचे काम जलदगतिने सुरू असून त्यापैकी पाच जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. यातील तीन जलकुंभातून शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी दिली. अमृत अटल योजनेच्या माध्यमातून सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.
बीडकरांना होणार तीन दिवसांआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:51 PM
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
ठळक मुद्देनगराध्यक्षांची माहिती : बिंदुसरा आणि माजलगाव धरणात पाणीसाठा वाढला