बीड : ध्वजारोहणासाठी शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून गोपाल शिवाजी भोसले, औदुंबर मदन रिंगणे, सचिन आसाराम मोरे (सर्व रा. खेर्डा. खु. ता. माजलगाव) यांना ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ८ हजार रूपये दंडाची शिक्षा येथील अप्पर सत्र न्या. ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली.२६ जानेवारी २०१६ रोजी ध्वजारोहणासाठी शाळेत जाणाºया दोन अल्पवयीन मुलींच्या हाताला वाईट हेतूने धरून तिघांनी कारमध्ये ओढले. त्यावेळी सदर मुलींनी आरडाओरड केली असता तिघे आरोपी कारमधून पसार झाले. या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंग, अपहरण, गुन्ह्याचा प्रयत्न करणे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासानंतर जिल्हा स िन्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी तसेच तुळशीराम खोटे, दत्तात्रय वाळसकर, माऊली माध्यमिक विद्यालय एकदराचे मुख्याध्यापक, तपासी अधिकारी एस. एस. चाटे यांच्या साक्ष अतिशय महत्वाच्या ठरल्या.न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून अप्पर सत्र न्या. ए. एस. वाघमारे यांनी सर्व तीन आरोपींना कलम ३५४ अ नुसार एक वर्ष सश्रम कारावास व २००० रूपये दंड, कलम ३६३, ५११, ३४ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी ३००० रुपये दंड, बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार तीन वर्षे सनम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सहायक सरकारी वकील ए. एस. तांदळे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोह वाव्हूळकर यांनी काम पाहिले.
शाळकरी मुलींच्या विनयभंग प्रकरणी तिघांना तीन वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:35 PM