शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

तरुणाच्या खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप; बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:26 AM

मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.

बीड : मोबाईलमधील मेमरी कार्डवरून झालेल्या वादात एका तरुणाचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी तिघांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला.

शेख जावेद शेख मैनुद्दीन [२३, रा. शेवगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर] असे खून झालेल्या तरुणाचे नाव होते. शेख अन्सार, शेख शहाबाज, शेख नसीर अशी जन्मठेप ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. १८ डिसेंबर २०१५ रोजी पेठ बीड भागातील चंदनशाह दर्गासमोर रात्रीच्या वेळी जावेदचा खून झाला होता. १४ डिसेंबर रोजी जावेद हा शहेंशाहवली दर्गा येथे संदल ऊर्स असल्याने बीडला आला होता. चार दिवस राहिल्यानंतर १८ तारखेला तो सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. मोबाईलही बंद येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जावेदचा मृतदेह दर्गासमोरील कब्रस्तानमध्ये आढळून आला. त्यानंतर जावेदचा भाऊ शेख फिरोज याने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता ओळख पटली. त्यानंतर पेठ बीड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता.

पोलीस चौकशीत शेख फिरोज याने भाऊ जावेद व शेख अन्सार याचे काही दिवसांपूर्वी भांडण झाल्याचे सांगितले. अन्सार व त्याच्या साथीदारांनी माझ्या भावाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केल्याची फिर्याद फिरोजने पेठ बीड ठाण्यात दिली. तत्कालीन सपोनि बी. डी. पावरा यांनी प्रकरणाचा तपास करून चार आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. दोन विधि संघर्ष बालकांना चौकशीअंती सोडून दिले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले.

तपासादरम्यान घटनेच्या दिवशी रात्री ११.३० वाजता चंदनशाह दर्गासमोर शेख अन्सारने जावेद यास लाकडी दांड्याने मारले. त्यानंतर त्याला उचलून कब्रस्तानमध्ये नेल्याचे सिद्ध झाले. एका साक्षीदाराने ही घटना आपण पाहिल्याचे पोलीस व न्यायालयासमोर सांगितले. शवविच्छेदन अहवालातूनही दांड्याने मारहाण झाल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीजन्य पुरावा व इतर बाबी न्यायालयात सिद्ध झाल्याने बीड येथील पहिले सत्र न्या. बी. बी. वाघ यांनी शेख अन्सार, शेख शहाबाज व शेख नसीर या तिघांना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चौथा आरोपी सय्यद आमेर सय्यद चाँद विरोधात ठोस पुरावा न मिळाल्याने त्याची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.अन्सार विरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रारयेथील सामाजिक कार्यकर्ते जावेद कुरेशी यांना वैयक्तिक व्हिडीओ पाठवून या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख अन्सार याने ब्लॅकमेल केल्याची तक्रार कुरेशी यांनी शहर ठाण्यात दिली होती. व्हिडीओ असलेले मेमरी कार्ड मयत जावेदने चोरले होते. त्यामुळे अन्सारची कोंडी झाली होती. याच रागातून आपल्या साथीदारांच्या मदतीने जावेदचा काटा काढल्याचे सिध्द झाले. या घटनेत जावेद कुरेशी, शेख रहीम व शहर ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दीपाली गित्ते यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

टॅग्स :BeedबीडMurderखूनMarathwadaमराठवाडा