डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला; पण काहींच्या जीवनात शिक्षणासाठी अनेक खास्ता खाण्याची पाळी येते. शिक्षण घेण्याची इच्छा असूनही हलाखीच्या परिस्थितीमुळे काहींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेली मुले शिक्षणापासून वंचित राहतात. येथील सहारा अनाथाश्रम हे अनाथ वंचित मुलांचा सहारा बनले आहे. या अनाथाश्रमात १०६ अनाथ मुले शिक्षण घेत आहेत. अनाथाश्रमाला धान्यरूपाने मदत करण्यात आली. याप्रसंगी संघर्ष धान्य बँकेचे शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, सुभाष काळे, सुरेश नवले, पोलीस रणजित पवार, किरण बेद्रे, संतोष गर्जे व विद्यार्थी उपस्थित होते. स्वखुशीने दानशूर व समाजसेवी संस्था बँकेत आपले योगदान जमा करत आहेत. ही बीड जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. संघर्ष धान्य बँकेच्या वतीने आज खरीखुरी डॉ. बाबासाहेब यांची जयंती साजरी करून चांगले काम केल्याची भावना सहारा अनाथाश्रमाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. कोरोनाच्या काळात शेतकरी संकटात आहे. अशावेळी सर्वांनी शेतकऱ्यांची फळे घ्यावीत असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
लोकसहभागातू १७ क्विंटल धान्य
संघर्ष धान्य बँकेत गेल्या तीन वर्षांपासून अनेक समाजसेवी मंडळी अशा अनाथ, वंचित घटकांसाठी धान्य जमा करत आहेत. मार्च महिन्यात संघर्ष धान्य बँकेत जवळपास १७ क्विंटल धान्य जमा झाले. त्यातील तीन क्विंटल धान्य सहारा अनाथाश्रमास मदत म्हणून देण्यात आले. तसेच उर्वरित धान्य कोरोना काळात बेरोजगार झालेल्या गरीब कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहे.
===Photopath===
150421\sakharam shinde_img-20210415-wa0023_14.jpg