माजलगाव
: लॉकडाऊन असतांनाही शहरात मोठ्या प्रमाणात दुकाने सुरू आहेत. अनेकवेळा सांगुनही ऐकत नसलेल्या तीन दुकानांवर शुक्रवारी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी कारवाई करत तीन दुकाने सिल केली.
शहरात लॉकडाऊन असताना व पोलिसांनी मागील आठवड्यात सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले होते. असे असताना शहरात बंद शटरच्या आत बिनधास्त दुकाने सुरू आहेत. पोलिसांनी अनेकवेळा समजावून सांगुनही फायदा होत नसल्याने शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकासमोरील भागात सुरू असलेल्या वैजनाथ पांडुरंग नाईकनवरे यांच्या मालकीचे बेकरी, केकचे दुकान ,गणेश सुभाष थळकर यांचे ज्यूस सेंटर व भोजनालय सुरू होत्या. पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी ही दुकाने सिल केली. तर मार्च महिन्यात दोन दुकानांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले होते. कारवाईच्या वेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निता गायकवाड ,पो.कॉ. तळेकर , पो.कॉ. ठेंगल,नगरपालिकेचे कर्मचारी भारत मिसाळ व चव्हाण हजर होते.
===Photopath===
210521\img-20210521-wa0105_14.jpg