लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. तर आमरसाचा बेत घरोघरी व लग्गातील भोजनावळीत आखला जात आहे. यातच रसदार आणि गुणकारी अननसाला मागणी वाढली असून राणी जातीच्या तीन हजार अननसांची बीडमध्ये दर दोन दिवसाला आवक होत आहे.
येथील फळबाजारात खरबुज, कलिंगडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यावर्षी चांगल्या पाऊसमानामुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे खरबूज व टरबूज पिकांवर बहुतांश शेतकºयांनी भर दिला. बाजारात २० ते ३० रुपये किलो खरबुज तर ३० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत आकारानुसार कलिंगडाची विक्री होत आहे. त्याचबरोबर हापूस, पायरी, केशर, बदाम, लालबाग आंब्याची आवक होत आहे.
रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी १५०० ते २५०० रुपये तर पायरी, बदाम आंबे ६० ते ७० रुपये किलो विकले जात आहेत. कर्नाटक हापूस १०० ते २०० रुपये डझनप्रमाणे विक्री होत आहेत. तर राहुरी, पुणे, श्रीरामपूर भागातून चिकूची आवक होत असून आकार व दर्जानुसार भाव आहेत. शीतगृहातील द्राक्ष, सफरचंदही बाजारात असून भाव तेजीत असलेतरी मागणी बºयापैकी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या फळांबरोबरच रसदार व चवीला स्वादिष्ट अननसाला गत काही दिवसांपासून मागणी वाढली आहे. २५ ते ३० रुपयांना एक अननस विकले जात आहे. तसेच रमजान महिन्यात मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेत उत्पादकांनी थांबविलेली फळांची कटाई सुरु होणार असल्याने येत्या काही दिवसात आवक वाढून दरही स्थिरावतील असे सूत्रांनी सांगितले.हॉटेल चालकांकडून मागणीदर्जेदार अननसाचे ठोक भाव ४०० ते ५०० रुपये डझन आहेत. तर साधारण प्रतीच्या अनानसाचे भाव ३०० ते ३५० रुपये आहेत. किरकोळ बाजारात ४०० रुपये डझन भाव आहेत. सध्या तापमान ४२ च्या पुढे असल्याने तसेच झळा तीव्र झाल्याने अननसाला मागणी आहे. ज्यूसबार व हॉटेल चालकांकडून मोठी मागणी आहे.
‘राणी’लाच सर्वाधिक पसंतीराजा आणि राणी या जातीच्या अननसांपैकी राणी जातीच्या फळांना मागणी आहे. राजा जातीच्या अननसाला प्रक्रिया उद्योगांकडून मागणी आहे. जाम, जेली व इतर उपपदार्थांसाठी या फळाचा वापर होतो.येथून सर्वाधिक आवकतामिळनाडू, केरळ भागातून पुणे मंडई व तेथून बीडसह इतर बाजारात अननसाची आवक होत आहे.