शहरातील एकमेव लसीकरण केंद्रावर नागरिकांची आठ दिवसांपासून तोबा गर्दी होत होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. आरोग्य प्रशासनाने याची दखल घेवून परळीत आणखी दोन लसीकरण केंद्र वाढविले. शक्तीकुंज वसाहतीतील दवाखान्या मध्ये व शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिरमध्ये लसीकरण करण्याची सोय बुधवारपासून उपलब्ध करून देण्यात आली. थर्मल कॉलनीतील वसाहतीतील दवाखान्यामध्ये १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना लस दिली? जाणार आहे. तर 45 वर्षावरील नागरिकांना पहिला डोस खंडोबा मंदिर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिला जाणार आहे. तर ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे नटरंग मंदिरामध्ये देण्याची सोय करण्यात आली आहे.
तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पहिला व दुसरा डोस पोहनेर, धर्मापुरी, मोहा ,सिरसाळा, नागापूर या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र आहेत.
लसीकरणाच्या ठिकाणी सामाजिक आंतर पाळावे व मास्क वापरावा ,ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करावी या सूचनांचे पालन करून लसीकरणासाठी सहकार्य करावे तसेच गरज भासल्यास आणखी लसीकरण केंद्र वाढविण्यात येतील. - डॉ. लक्ष्मण मोरे , तालुका आरोग्य अधिकारी परळी.
येथील लसीकरण केंद्रात आम्ही -पती - पत्नी बुधवारी ५ तास रांगेत थांबून कुपन घेतले. कुपन नंबरप्रमाणे लस देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. गुरुवारी चित्र वेगळे पहाण्यास मिळाले कुपन नसलेलेच रांगेत होते. लस किती मिळाल्या आणि माझा ३२ नंबर असुनही लस का मिळाली नाही ? कुपन नसणाऱ्यांना का दिली? कुपन का दिले याची चौकशी करावी. - मुकुंद बुद्रूकर, नागरिक, परळी
शहरात लसीकरणात प्रचंड गोंधळ निर्माण होत असून सामान्य नागरिकांबरोबर जेष्ठ नागरिकांनाही लसीकरण केंद्रावर तासनतास रांगेत उभे राहून लस मिळत नसल्याने नागरिक परेशान आहेत. लसीकरण केंद्रावर "सोशल डिस्टन्स " पूर्णपणे फज्जा उडाल्याने ऑनलाईन का ऑफलाईन नोंद करणाऱ्या नागरिकाला लस मिळणार हे सुद्धा आरोग्य प्रशासनाने स्पष्ट करावे . प्रा. पवन मुंडे, परळी.
फोटो ,परळी तालुक्यातील मोहा येथे गुरुवारी सामाजिक अंतराचे पालन करीत ग्रामस्थांनी लस घेतली.
===Photopath===
060521\img-20210506-wa0293_14.jpg