शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्याला तीन वर्ष उलटली, पण ठेवींचे काय ? महेश मोटेवरच्या अटकेचे फलित होईल का, हा प्रश्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 17:47 IST

Mahesh Motewar Fraud Case: देशभर गाजलेल्या समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवरला बीड शहर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे.

बीड: जादा व्याजाचे आमिष दाखवून सामान्यांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टिस्टेट को- ऑप सोसायटीचा ( Samruddha Jeevan Multistate Fraud Case ) संचालक महेश किसन मोतेवार (५३) ( Mahesh Motewar ) यास शहर पोलिसांनी अटक केली, पण या गुन्ह्याला तीन वर्षे उलटून गेली. शिवाय मोतेवारवर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे अटकेचे फलित होईल का, हा प्रश्नच आहे (What is the result of Mahesh Motewar's arrest?) . तपास सक्षम यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

देशभर गाजलेल्या समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवरला बीड शहर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. १९ रोजी न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मोतेवारवर २२ राज्यांत २८ गुन्हे नोंद असून बीडमध्ये पाच कोटींच्या अपहारप्रकरणी ३० ऑगस्ट २०१८ रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याऐवजी तो शहर ठाण्याकडेच राहिला. परिणामी तीन वर्षे उलटूनही यात कुठलाही तपास झाला नाही. संस्थेने गाशा गुंडाळल्याने कुठलेही पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी ठेवीदारांना आवाहन केल्यावर सुमारे दोन ते अडीच हजार ठेवीदारांनी कागदपत्रे सादर केली. त्यानुसार मूळ एफआयआरमधील पाच कोटींच्या अपहाराचा आकडा २५ कोटी रुपयांच्या घरात गेला. त्यामुळे बीडमधील घोटाळा ५० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सीआयडीला सगळे पुरावे दिले...२० नोव्हेंबर रोजी महेश मोतेवारची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तपास अधिकारी रवी सानप यांनी चौकशी केली, तेव्हा त्याने पुणे सीआयडीने केलेल्या अटकेवेळी त्यांनी हार्डडिस्क व इतर पुरावे जप्त केले. त्यामुळे आता कुठले पुरावे शिल्लक राहिले नाहीत, असा दावा त्याने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सखोल तपास का नाही ?या प्रकरणात आतापर्यंत उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास होता. दोन महिन्यांपूर्वी तो उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांच्याकडून पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्याकडे सोपवला. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेसारखी सक्षम यंत्रणा असताना शहर ठाण्याकडेच गुन्हा का ठेवला, असा प्रश्न फिर्यादी सय्यद रहेमा सय्यद नियामत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस महानिरीक्षकांपासून ते महासंचालकांपर्यंत पत्रव्यवहार करून सखोल तपासासाठी प्रकरण वर्ग करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी