धारूर : माजलगाव येथून सोलापूरला २२ टन सोयाबीन घेवून जाणारा ट्रक धारूर घाटात ब्रेक निकामी झाल्याने मागे सरकून कठड्यावर आदळला . या वेळी झालेल्या अपघातात कठडा तुटून ट्रक २०० फुट खोल दरीत कोसळल्याची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या थरारक घटनेत प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर उडी घेतल्याने चालक बचावला .
याबाबत अधिक माहिती अशी की, चालक अस्पाक रफीक याने माजलगाव येथून सोयाबीन सोलापूरला नेण्यासाठी ट्रक ( क्र .एम.एच. १३, ४४७४ ) मध्ये भरण्यात आला होता. ट्रक धारूर येथील घाटात ४ वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर तिव्र उतार व वळणाच्या ठिकाणी तो मागे सरला. यावेळी ट्रकमध्ये २२ टन सोयाबीन बोजा असल्याने ब्रेक लागले नाही. यातच ट्रक मागे सरकत असतांना वळणाच्या कठड्याला धडकला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बाहेर उडी घेतली. यानंतर ट्रक वेगाने खाली येत कठडा तोडून २०० फुट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचा चक्काचुर झाला असून केवळ सापळा राहीला आहे. पोते फुटून सोयाबीन डोंगरावर पसरले आहे.