जसे प्रशिक्षण पूर्ण होताच, काहींना त्या- त्या विभागांतर्गत असलेल्या डेपोला नियुक्त्या देखील दिल्या परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन डाऊनमुळे एसटी प्रशासनाने एकाएकी परिपत्रक काढून नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करून सर्व प्रशिक्षण थांबवण्यात यावत असे आदेशित केले. त्यानंतर पुढे नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पूर्ववत करण्याचे पत्र काढले व त्यांना काम असेल तरच वापरावे, असे आदेशित केले परंतु आता एसटी बऱ्यापैकी सर्वत्र चालू झालेली असताना देखील थांबवलेले चालक तथा वाहक यांची प्रशिक्षण चालू करण्याचे अध्यापनही आदेश काढले नाहीत. यामुळे विविध डिव्हिजनला प्रशिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. हे सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या संबंधित एसटीच्या डिव्हिजनची उंबरे झिजवत आहेत. त्यांना संबंधित डिव्हिजनमधून ‘आम्हाला आदेश प्राप्त झाला नाही, अमुक नाही, तमुक नाही’ अशी उत्तरे अधिकारी देत आहेत. हे ऐकून त्यांना माघारी परतावे लागत आहे.
या हजारो बेकार, नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना एसटी प्रशासन कधी न्याय देणार? येत्या पंधरा दिवसात परिवहन मंत्री अनिल परब व एसटी प्रशासनाने प्रशिक्षणे चालू करण्याबाबत व डेपोत नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना नियमित ड्युटी देण्याबाबत परिपत्रक न काढल्यास अहमदनगर डिव्हिजनसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष ससाने, सागर आढाव, सागर गायकवाड, संतोष पवार, रोहिदास पालवे, अनिल दुर्गे, सावता कातखडे, संदीप आग्रे, व बीड व अहमदनगर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी दिला आहे.