.....
डोंगरकिन्ही-पारनेर रस्त्याची दुरवस्था
बीड : डोंगरकिन्ही येथून जामखेडला जाणारा डोंगरकिन्ही-पारनेर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन दुचाकी चालविणे देखील अवघड बनले आहे. तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे. या रस्त्याचे काम मंजूर होऊनही अडले आहे, असेही येथील नागरिकांनी सांगितले.
...
अंगणवाडी सेविकांना दिलासा
बीड : जिल्ह्यात दोन अंगणवाडी सेविकांंना कोरोनात जीव गमवावा लागला. या सेविकांना शासनाने ५० लाख रुपयांचा विमा मंजूर केला आहे. उशीरा का होईना अंगणवाडी सेविकांच्या वारसांंना न्याय मिळाला आहे. मंजूर विमा झाल्याने अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आठ महिन्यानंतर या अंगणवाडी सेविकांंना न्याय मिळाला आहे.
....
मौजवाडीत निर्जंतुकीकरण फवारणी
बीड : तालुक्यातील माैजवाडी येथे कोरोनाचे बहुसंख्य रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तेजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोडीयम हायपोस्लोराईची फवारणी करण्यात आली. नागिरकांनी कोरोनाकाळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच चव्हाण यांनी केले आहे.
...
साईडपट्ट्यावर अतिक्रमण
अंमळनेर : बीड-नगर अंमळनेर मार्गे जाणा-या रस्त्यावर साईडपट्ट्यावर अतिक्रमण झाले आहे. नागरिकांनी रस्त्यावर गावोगावी सरपंच, कचरा टाकला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गवत उगवले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या साईडपट्ट्यांवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहेे.
...
फळझाडे जगविण्यासाठी धडपड
आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अनेक गावात फळझाडांची शेतक-यांनी लागवड केली आहे. परंतु उन्ह्याळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे फळबागांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी शेततळ्यात टँकरने पाणी आणून टाकले आहे. तर काहींनी थेट झाडांना दिले आहे. फळबागा वाचण्यासाठी आता शेतक-यांंना पावसाची प्रतीक्षा आहे.
...
सुलेमान देवळा येथे पुलाची मागणी
धानोरा : धानोरा-सावरगाव रस्त्यावर सुलेमान देवळा गावानजीक कांबळी नदीवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलावरुन नेहमी पाणी असते. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. गेल्या अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी आहे. परंतु गेल्या ४० वर्षापासून येथे पूल झाला नाही. तरी येथे नवीन पुलाची उभारणी करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
....
जनावरांच्या चा-याची टंचाई
बीड : जिल्ह्याच्या अनेक भागात उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे मका, घास पिके जगविण्यासाठी शेतक-यांना अडचणी येत आहे. त्यात जनावरांच्या चा-याची टंचाई भासत आहे. अनेकांना विकतचा चारा घेऊन जनावरे जगविण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.
...