- सोमनाथ खताळ बीड : परळी येथील सुदाम मुंडे याच्या खाजगी रुग्णालयात गर्भपात होणार असल्याची ‘टीप’ आरोग्य विभागाला मिळाली होती. याच अनुषंगाने शनिवारी रात्री छापा मारला. रुग्ण आढळले नाहीत, परंतु गर्भपातासाठी आवश्यक सर्व औषधी व साहित्य आढळले. ते सर्व जप्त केल्याने येथे गर्भपात होणार असल्याच्या माहितीला पुष्टी मिळाली आहे.
सुदामने लिहून दिलेल्या चिठ्ठीवर जेथे सोनोग्राफी झाल्या, त्या सर्वांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. संबंधित एका सेंटरवरही मध्यरात्री धाड टाकली असून त्याची झाडाझडती घेतली जात असल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. वैद्यकीय व्यवसायाची मान्यता नसतानाही रुग्णालय सुरू केल्याच्या आरोपाखाली रविवारी येथील डॉ. सुदाम मुंडेला परळी शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आठपैकी चार गर्भवतीसुदामने आठ रुग्णांची तपासणी केल्यानंतर रेफर लेटर देऊन परळी शहरातीलच काही सोनोग्राफी सेंटरवर पाठविले होते. यात चार गर्भवतींचा समावेश होता. या महिलांची इतर आजारासाठी सोनोग्राफी केली की, गर्भपातासाठी हे समोर आलेले नाही. आरोग्य, पोलीस विभाग तपास करीत आहे.