शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आज ४४ हजार विद्यार्थी देणार जिज्ञासा कसोटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:19 AM

जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी (३० एप्रिल) रोजी होत असून ४४ हजार ४२९ विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचे अनुमान काढले जाणार आहे.खबरदारी घ्या, उन्हापासून बचाव करासर्व शाळांतील चौथी व सातवी वर्गाच्या शिक्षकांनी मुलांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत आणण्याचे व परत घरी पोहचविण्याचे योग्य ते नियोजन करावे. उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ आदी आवश्यक साहित्य विद्यार्थी व शिक्षकांनी सोबत ठेवणे, परीक्षा केंद्रावर संचालकांनी विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याच्या जारची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था सावलीतच करावी. आवश्यकता असल्यास मंडप उभारावा, विद्यार्थी उन्हामध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, वर्गात पंख्यांची पुरेशी व्यवस्था करावी, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत लेखी कळवावे, कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर एक कक्ष स्थापन करुन प्रत्येक केंद्रावर सूचनेनुसार व्यवस्थेचा आढावा घेण्याचे कळविले आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.कशासाठी परीक्षा ?शिष्यवृत्ती परिक्षेच्या धर्तीवर चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये नियमित शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, व्यवहार ज्ञान, सामान्य ज्ञान व बौध्दिक विकास करणे, तसेच पाठ्यपुस्तकातील शिक्षणा बरोबरच सभोवतालच्या घटना, निसर्ग, पर्यावरण, निरीक्षण, आकलन करुन जिज्ञासा वाढविणे, प्रयोग, प्रात्यक्षिकाद्वारे व्यवहारातील गोष्टी समजून घेणे, यासाठी बीड जिल्हा परिषद ‘विद्यार्थी जिज्ञासा कसोटी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असून, याचे निश्चितच चांगले परिणाम मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.ओएमआर पद्धतीने तपासणीजिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता चौथीचे ३१ हजार ७२७ विद्यार्थी १६४ केंद्रावर, तर इयत्ता सातवीचे १२ हजार ७०२ विद्यार्थी १५९ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.३० एप्रिल रोजी सकाळी ९. ३० ते ११.३० व दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत विद्यार्थी आकलन कसोटी व विद्यार्थी सामान्य, व्यवहार ज्ञान कसोटी असे दोन पेपर आहेत.प्रत्येकी २०० गुणांची परीक्षा असून परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे आहे.प्रश्नपत्रिका सर्व तालुक्यात वितरीत झाल्या असून ओएमआर पध्दतीने उत्तरपत्रिकांची तपासणी होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी