परळी (बीड ) : येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात आज राज्यातील इतर केंद्राच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे केवळ १०० मेगावॅटएवढी वीज निर्मिती झाली. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील सात औष्णिक विद्युत केंद्रात सर्वात जास्त चंद्रपूर येथे 1475 मेगावॅटएवढी वीज निर्मिती झाली.
सध्या परळी येथील नवीन वीज निर्मिती केंद्रातील केवळ 250 मेगावॅट क्षमतेचा क्रमांक 8 हाच एकमेव संच सुरु आहे. या संचातुन आज दुपारी 12 च्या सुमारास स्थापित क्षमतेपेक्षा सर्वात कमी म्हणजे केवळ 100 मेगावॅटची वीज निर्मिती झाली. या केंद्रातील 250 मेगावॅटचे इतर दोन संच 24 जूनपासून बंद आहेत. त्यामुळे 500 मेगावटची वीजनिर्मिती यापूर्वीच ठप्प आहे.
तालुक्यातील दाऊतपुर येथे नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे. या केंद्रात 250 मेगावट चे संच क्रमांक 6, 7, 8 असे तीन संच आहेत. प्रत्येक संच 250 मेगावॅट क्षमतेचे आहेत. या तीन पैकी 2 संच 12 दिवसांपूर्वी बंद ठेवले आहेत.त्यामुळे 500 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प आधीच ठप्प आहे. तर संच क्रमांक 8 मधून केवळ 100 मेगावॅट च वीज निर्मिती चालू आहे. या संचातुन 150 मेगावॅट कमी वीज निर्मिती झाली. यामुळे या केंद्रातून एकूण 650 मेगावॅट वीज निर्मिती कमी झाली.
ताजी आकडेवाडी :नाशिक- 278 मेगावॅट, कोराडी- 839 मेगावॅट, खापरखेडा- 447 मेगावॅट, पारस- 329 मेगावॅट, परळी - 100 मेगावॅट, चंद्रपूर -1475 मेगावॅट, भुसावळ- 665 मेगावॅट
विजेची मागणी कमी आहेविजेची मागणी कमी असल्याने येथील दोन संच बंद ठेवण्याच्या सूचना मुंबई येथील मुख्य कार्यालयातून प्राप्त झाल्या. त्यामूळे दोन संच बंद ठेवले आहेत, असे येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले