बीड : शहरातील एका शाळकरी मुलीचे मित्राच्या मदतीने अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात मदत करणाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरू असून, यातील तीन आरोपींनी शहरातील विविध भागातून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. अत्याचार केलेल्या मुलाच्या वडीलांना यापुर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.शहरातील १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मित्राच्या मदतीने अपहरण करुन नेकनूर येथे अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून त्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला होता. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपी, त्याला मदत करणारे त्याचे मित्र व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्वत: पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी याप्रकरणाचे गांभिर्य ओळखून याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.याप्रकरणातील इतर आरोपींची नावे काढून त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होती. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली होती. यामधील तीन आरोपींना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. गुन्हा करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यातील अभिषेक बोराडे व प्रज्वल शिंदे यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळापुढे हजर करुन त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये शैलेश निर्मळ, प्रज्वल शिंदे, अभिषेक बोराडे व इतर दोन अल्पवयीन यांचा समावेश आहे. इतर काही जणांना अटक करण्यात येणार असून त्यादिशेने पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:02 AM
शहरातील एका शाळकरी मुलीचे मित्राच्या मदतीने अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात मदत करणाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरू असून, यातील तीन आरोपींनी शहरातील विविध भागातून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
ठळक मुद्देमदत करणे अंगलट : दोघांची तुरुंगात रवानगी तर अल्पवयीन निरीक्षण गृहात