गंगापूजनानिमित्त निराधार, निराश्रित दिव्यांगांना भोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यातील राक्षसभुवन येथे सुरू असलेल्या आजोळ परिवारातील निराधार, निराश्रित दिव्यांगासाठी अन्नदान करण्याची प्रथा चांगलीच रुजली आहे. श्रीगोंदा येथील संतोष चंद्रकांत झरकर यांचे नुकतेच निधन झाले. होते. यानिमित्त जावई हरिप्रसाद गाडेकर यांनी झरकर यांच्या गंगापूजनानिमित्ताने ‘आजोळा’तील लोकांना मिष्टान्न भोजन दिले.
पिंडाला काकस्पर्श होणे म्हणजे मुक्ती मिळते असा समज आहे. कधी कधी कावळे असून,देखील काकस्पर्श होत नसल्याचे पहावयास मिळते. मात्र झरकर यांच्या दोन्हीही विधीत काकस्पर्श झाला. सिद्धटेक पाठोपाठ राक्षसभुवन इथेही आजोळ परिवारात काकस्पर्श असा दुहेरी योगायोग जुळून आला, आजोळात प्रथमच काकस्पर्श पहावयास मिळाला असल्याचे कर्ण तांबे यांनी सांगितले. झरकर हे शिरूर येथील पत्रकार विजयकुमार गाडेकर यांचे व्याही तर ज्ञानाईचे संचालक हरिप्रसाद गाडेकर यांचे सासरे होत.
....
===Photopath===
050621\vijaykumar gadekar_img-20210604-wa0043_14.jpg