संगमजळगाव येथे वाळूचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदारांच्या आदेशाने महसूलचे एक पथक सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास गावात गेले असता तेथे तीन ट्रॅक्टर वाळू घेऊन आल्याचे दिसताच ते पकडण्यात आले. ही कारवाई होत नाही तोच नदीपात्राकडे वाळूचा आणखी एक ट्रॅक्टर असल्याचे समजताच या पथकातील काही अधिकारी व कर्मचारी हे नदीपात्रात असलेले ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेले तर काही जण ट्रॅक्टर जवळच थांबले होते. ही संधी साधत गावात पकडलेले तीनही ट्रॅक्टर चालकांनी हात हलवित पोबारा केला.
कर्मचाऱ्यांनी पळून गेलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. मात्र ते तीनही ट्रॅक्टर पसार झाले होते. या प्रकरणी मंडळाधिकारी फिर्याद देतील. गेवराई पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.