अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक व बस स्थानक परिसरात रस्त्यावरच प्रवासी वाहतुकीची वाहने व ऑटोरिक्षा यांचे पार्किंग केले जाते. अगोदरच हा रस्ता अरुंद असल्याने वाहनांची मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते. त्यातच प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
बसथांब्याची मागणी बीड : तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खजाना विहिरीजवळ बसथांबा करावा, अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे. हे ठिकाण ऐतिहासिक असल्याने, येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी होते. वाहनांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी येथे बसथांबा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्वच्छतेची मागणीकडे होतेय दुर्लक्ष
वडवणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने ते सुंदर बनले आहेत, परंतु या दुभाजकाशेजारी घाण झाल्याने हा परिसर अस्वच्छ दिसू लागला आहे. त्यामुळे नगर पंचायतने दुभाजकाच्या बाजूंची स्वच्छतेची मागणी आहे.
मोबाइलचा अतिवापर
वडवणी : ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. पालकांची इच्छा नसतानाही अभ्यासासाठी मुलांना मोबाइल द्यावा लागत आहे. मात्र, डोळ्याचे व कानाचे आजार वाढत असून, एकलकोंडेपणा वाढत आहे, तरीही याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.