अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघातून भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना १,२२,७३६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना ८९,६४० मते मिळाली. नमिता मुंदडा या ३३,०९६ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या. पक्षांतर मुंदडा यांच्यासाठी फायदेशीर ठरले. तब्बल सात वर्षानंतर केज विधानसभा मतदारसंघात पुन्हा मुंदडा पर्वास प्रारंभ झाला आहे.राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करूनही ती नाकारून भाजपामध्ये प्रवेश करून नमिता मुंदडा महायुतीच्या उमेदवार राहिल्या. त्यांचे पक्षांतर संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. गुरुवारी केज तहसील कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणी झाली. या निवडणुकीत नमिता मुंदडा यांना १,२२,७३६, पृथ्वीराज साठे यांना ८९,६४० तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वैभव स्वामी हे ९,०७२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. केज मतदार संघातील निवडणूक तुल्यबळ होईल. अशी अपेक्षा ग्राह्य धरली जात होती. मात्र, मुंदडा यांना मिळालेल्या मताधिक्यांमुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सोयिस्कर ठरली.दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर २०१२ नंतर मुंदडा परिवारातील उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नमिता मुंदडा यांना ४२ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. पराभवानंतर खचून न जाता जोमाने जनसंपर्क वाढवून त्या मतदारसंघात कार्यरत राहिल्या. याचा मोठा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर तब्बल सात वर्षांनी मतदारसंघात पुन्हा मुंदडा पर्व सुरू झाले आहे. नमिता मुंदडा या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिल्या. २९ फेऱ्यांमध्ये त्यांनी ३३ हजार मतांची आघाडी मिळवली.मिळालेले टपाली मतदानच्केज विधानसभा मतदारसंघात टपालाद्वारे प्राप्त झालेले एकूण मतदान १७१७ आहे. यात भाजपच्या नमिता मुंदडा यांना ६९७ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना ८८४, वंचित आघाडीचे वैभव स्वामी यांना ८४ टपाली मते मिळाली.
पक्षांतर मुंदडांसाठी फायदेशीर ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:11 AM
केज विधानसभा मतदारसंघातून भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना १,२२,७३६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना ८९,६४० मते मिळाली. नमिता मुंदडा या ३३,०९६ मताधिक्य घेऊन विजयी झाल्या.
ठळक मुद्दे३३७९३ चे मताधिक्य : पहिल्या फेरीपासूनच नमिता मुंदडा राहिल्या आघाडीवर