: गौण खनिज वाहतूक परवान्यापेक्षा अधिकची वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्परवर केजच्या मंडळाधिकाऱ्यांनी कारवाई करत टिप्पर जप्त करून केज तहसील कार्यालयात लावले. जास्तीची वाळू वाहतूक केल्याप्रकरणी ४ लाख १७ हजार ९६३ रुपयाचा दंड आकारणी करण्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर करण्यात आला असल्याची माहिती मंडलाधिकारी भागवत पवार यांनी दिली आहे.
दरम्यान वाळू वाहतुकीचा परवाना कोल्हापूरचा असताना कोल्हापूरला न जाता टिप्पर वाळू घेऊन अंबाजोगाईकडे जात होता, अशी माहिती पवार यांनी दिली आहे.
माजलगावकडून वाळू घेऊन आलेल्या हायवा टिप्पर (क्रमांक एम एच ४४ यु १३१०) हा अंबाजोगाईकडे २६ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घेऊन जात होता. केजचे मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी अंबाजोगाई रस्त्यावर वाळू घेऊन जात असलेल्या टिप्पर थांबवत त्याच्याकडे गौण खनिज वाहतूक परवाना मागितला असता चालकाने त्याना एक तीन ब्रासचा व एक दोन ब्रासचा असे एकूण पाच ब्रास वाळू वाहतूक करण्याचा परवाना दाखवला मात्र मंडळ अधिकारी पवार यांना हायवा टिप्परमध्ये वाळू जास्तीची असल्याचा संशय आल्याने त्यांनी वाळूचे मोजमाप केले असता वाहतूक परवान्यापेक्षा जास्तीची वाळू हायवा टिप्परमध्ये आढळून आल्याने त्यांनी वाहतूक परवान्यापेक्षा जास्तीची वाळू वाहतूक केल्यामुळे टिप्पर जप्त करत केज तहसील कार्यालयात आणून लावले. जास्तीची वाळू वाहतूक केल्या प्रकरणी ४ लाख १७ हजार ९६३ रुपयाचा दंड आकारणी करण्याचा अहवाल तहसीलदार याना सादर केला असून सदरील टिप्पर हे माजलगाव येथील राहुल सुखदेव लंगडे यांच्या मालकीचे असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
गौण वाहतुकीचा परवाना एकीकडचा आणि वाहतूक मात्र भलतीकडेच
अंबाजोगाईकडे जात असलेल्या वाळूच्या टिप्पर चालकाकडे गौण खनिज वाहतूक करण्याचा परवाना हा कोल्हापूर कागल असा असताना तो अंबाजोगाईकडे वाळू घेऊन जात असल्याचे मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी सांगितले. तसेच कोल्हापूरचा गौण खनिज वाहतूक परवाना काढल्यानंतर गौण खनिज वाहतुकीसाठी तीन दिवसाचा अवधी मिळत असल्याने परवाना तिकडचा घ्यायचा आणि या परवान्यावर वाळूची वाहतूक जिल्ह्यात करायची, असा प्रकार असून यामध्ये मोठे गौडबंगाल असल्याचेही पवार यांनी सांगितले
===Photopath===
270421\deepak naikwade_img-20210427-wa0044_14.jpg~270421\deepak naikwade_img-20210427-wa0043_14.jpg