शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

वृक्षतोडीने आंदोलकांचा निवारा हिरावला, कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले ग्रीन शेडनेट भेट

By शिरीष शिंदे | Published: January 16, 2024 6:15 PM

सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गांधीगिरी आंदोलन

बीड : शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेले वृक्ष तोडण्यात आली आहेत. परिणामी, या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा वृक्ष निवारा हिरावला गेला आहे, याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी प्रशासनास ग्रीन शेडनेट भेट देत मंगळवारी गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी विविध मागण्या मांडण्यात आल्या.

बीड जिल्ह्यात केवळ २.४ टक्के वनक्षेत्र असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जिल्ह्यात ३३ टक्के वनक्षेत्र अपेक्षित आहे. वनक्षेत्र कमी असल्याने बीड जिल्ह्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे. मात्र, वनक्षेत्र आणि हरितक्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा जिल्हा प्रशासन ठोस भूमिका घेत नाही. उलट वृक्षतोडीवर भर देत आहे. नगर रोडवरील शासकीय कार्यालयासमोरील संरक्षण भिंतींच्या आतील रस्ता कामास अडथळा नसणारी अनावश्यक वृक्षतोड थांबवावी, वन विभागातील १० कोटी ८४ लाख गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करावी, अवैध बेसुमार वृक्षतोडप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड उपलब्ध करून देण्यात यावा.

या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी ग्रीन शेडनेट तयार केले. त्यास फुलांचे तोरण बांधून श्रीफळ फोडून जिल्हा प्रशासनाला भेट देऊन गांधीगिरी आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री बीड यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, सुदाम तांदळे, मुबीन शेख, मुस्ताक शेख, शिवशर्मा शेलार आदी सहभागी होते.

अनावश्यक वृक्षतोड थांबवावीबीड शहरातील नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, तहसील, न्यायालय कार्यालयासमोर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी असलेले हिरवेगार महाकाय वृक्ष रस्ता कामास अडथळा येत नाहीत. संरक्षण भिंतींच्या आतील झाडांची वृक्षतोड होत असून तातडीने थांबविण्यात यावी, तसेच रस्ते कामासाठी झाडे तोडल्यानंतर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणती योजना आखण्यात आली, याची माहिती वृक्षप्रेमींना द्यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन