लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : धारूर घाटात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही ट्रक उलटला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
धारूर ते तेलगाव हा राष्ट्रीय महामार्ग झाला;परंतु घाटाचे रूंदीकरण झाले नाही. रस्ता चकाचक केला. मात्र रस्त्याच्या बाजूच्या दरीच्या भागाकडील कठडे न उंच केले नाहीत. त्यामुळे घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कठडे तोडून वाहने दरीत कोसळत आहेत.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून तर अपघाताची मालिका रोजची झाली आहे. मंगळवारी तुळजापूरहून साखर घेऊन परतूरकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.-२३,७२०७) चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक सरळ खड्ड्यात जाऊन उलटला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, या रोजच्या अपघाताच्या मालिकांमुळे वाहनधारकांत मात्र भीती निर्माण झाली आहे तरी या घाटाने रुंदीकरण करून संरक्षण कठडे मजबूत करावेत, अशी मागणी प्रवासी, वाहनचालकांतून होत आहे.