शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बीडमध्ये क्षयरोग, कुष्ठरूग्ण शोध अभियानावर आशा, एनएचएम कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 2:43 PM

पाच दिवसात दोन लाखाऐवजी केवळ २५ हजार घरांचेच झाले सर्वेक्षण

ठळक मुद्देअभियानाच्या उद्दीष्टपूर्तीचे आव्हान  

बीड : आरोग्य विभागाच्यावतीने क्षयरोग व कुष्ठरूग्ण अभियान राबविले जात आहे. पाच दिवसात जवळपास १ लाख ९२ हजार ६०० घरांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित होते. मात्र, आशा सेविका व एनएचएम कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच दिवसांत केवळ २५ हजार १६ घरांचाच सर्वे झाला आहे. आता येणाऱ्या ९ दिवसात उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

१३ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र क्षयरोग व कुष्ठरूग्ण शोध अभियान राबविले जात आहे. यासाठी बीड आरोग्य विभागाने प्रशिक्षण, बैठका घेऊन नियोजन केले. आशा सेविका, एनएचएम कर्मचाऱ्यांना कामाचे मार्गदर्शन केले. मात्र, सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच अशासेविका विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या. त्यापाठोपाठ एनएचएमचे कर्मचारीही गेले. तीन दिवस झाले तरी त्यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. आशांचा संप मिटल्याचे सांगण्यात आले असून गुरूवारपासून त्या सर्वेक्षणाला सुरूवात करणार आहेत. बुधवारी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता या अभियानाला गती येऊ शकते.

दरम्यान, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मीकांत तांदळे यांनी याच सर्वेक्षणासाठी पाटोदा तालुका पिंजुन काढल्याचे सूत्रांकडून समजते. 

एका आशाला दररोज २० घरांचे उद्दीष्टग्रामीणमध्ये १०० तर शहरात ३० टक्के उद्दीष्टपूर्तीसाठी एका आशाला रोज २० घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट दिलेले आहे. त्यादृष्टीने पाच दिवसात १ लाख ९२ हजार ६०० घरांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ २५ हजार घरांचा सर्वे झाला आहे.

एक नजर आकडेवारीवरभेट दिलेले घरे - २५ हजार १६लोकसंख्या - १ लाख ९ हजार ५९४कुष्ठरूग्ण संशयीत - २१५नवीन रूग्ण - ३क्षयरोग संशयीत - २२३नवीन रूग्ण - ३

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटल