गेवराई : झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकासोबत ‘मॉब लिंचिग’ करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात शुक्र वारी रोजी कडकडीत बंद ठेवून दुपारी २.३० वाजता शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध घोषणांनी शहर दणाणले होते. यात शहरातील व तालुक्यातील मुस्लिमांसह सर्वधर्मीय, व्यापारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.झारखंड राज्यात मुस्लिम समाजाचा तबरेज अन्सारी या युवकाला तेथील समाजकंटकाने ‘मॉब लिचिंग’ करून त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आली. याचा देशभर निषेध करण्यात येत असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कडक शासन करावे, या मागणीसाठी गेवराई येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने शुक्र वारी कडकडीत बंद ठेवण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चास सुरूवात होऊन विविध घोषणा देत हा मोर्चा शहरातील शास्त्री चौक, माळी गल्ली, बेदरे गल्ली, मोमीनपुरा, भवानी पेठ, मेन रोड, चितेंश्वर गल्ली मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी भर पावसात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.या मोर्चेत शहरातील व तालुक्यातील मुस्लिमासह सर्वधर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोर्चाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
मूक मोर्चा काढून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:42 AM
झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकासोबत ‘मॉब लिंचिग’ करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात शुक्र वारी रोजी कडकडीत बंद ठेवून दुपारी २.३० वाजता शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देगेवराईत तीव्र संताप : मुस्लिम समाजासह इतर समाजांचा पाठिंबा