वडवणी : शहरातील चिंचवण रोडवर असणाऱ्या एका बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न दोघांनी केला. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
वडवणी शहरातील चिंचवण रोडवर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. याठिकाणी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरट्यांनी तोंडाला कपडा बांधून एटीएमच्या खोलीत प्रवेश केला. मशीनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांना मशीन फोडता आले नाही, दरम्यान, कोणीतरी येत आहे हे लक्षात आल्यानंतर दोन्ही चोरट्यांनी त्याठिकाणावरून पळ काढला. मात्र, दोन्ही चोरटे एटीएम खोलीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम वडवणी पोलीस करीत आहेत.
080721\08_2_bed_10_08072021_14.jpg
सीसीटीव्हीमधील कैद झालेले चोरटे