जिल्ह्यातील २ हजार ३६ संशयितांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात १ हजार ७१८ अहवाल निगेटिव्ह आले तर ३१८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात अंबाजोगाई तालुक्यातील ५९, आष्टी ४२, बीड ८८, धारूर ७, गेवराई ९, केज २५, माजलगाव ३१, परळी ३८, पाटोदा १८ आणि वडवणी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील २१७ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना कोविड केअर सेंटर व रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, सोमवार व मंगळवारी जिल्ह्यात ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात सोमवारी तळेगाव (ता. परळी) येथील ५५ वर्षीय महिला, कडा (ता. आष्टी) येथील ६५ वर्षीय पुरुष, यशवंतनगर, बीड येथील ६५ वर्षीय पुरुष व आदर्शनगर बीड येथील ७९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मंगळवारी एका मृत्यूची नोंद झाली. यात सहयोगनगर बीड येथील ८६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५ हजार १७९ एवढी झाली आहे. पैकी २२ हजार ८८७ कोरोनामुक्त झाले असून ६२६ जणांचा मृत्यू झाला आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पी.के. पिंगळे यांनी ही माहिती दिली.