शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

दोन दिवसांवर संक्रांत..सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:08 AM

मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात,

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तीन दिवसांत चोरटे जेरबंद, मागील वर्षी मकरसंक्रांतीलाही केले होते गुन्हे

बीड : मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात, अशा प्रकारे बीड शहरातील सुभाष रोड परिसरातून ९ जानेवारी रोजी एका महिलेच्या गळ््यातील सोन्याचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केला होता. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणातील दोन सोनसाखळी चोरांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.सोनाजी अशोक जाधव (वय २७ रा. गांधीनगर, बीड ) आकाश शाम जाधव (वय २९ रा. सुभाष कॉलनी पेठ बीड) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरांची नावे आहेत. ९ जानेवारी रोजी मोनिका मंगेश लोळगे नामक महिला आपल्या मुलासोबत सुभाष रोड येथे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर सोने चोरण्याच्या उद्देशाने वरील दोन चोरट्यांनी पाळत ठेवली होती.खरेदी झाल्यानंतर रिक्षात बसून त्या घरी जात असताना, चोरट्यांनी दुचाकीवरून त्या रिक्षाचा पाठलाग केला. त्यावेळी अचानक चोरट्यांनी त्या महिलेच्या गळ््यातील सोने चोरण्याचा प्रयत्न केला.दरम्यान महिलेने आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथू पळ काढला. त्यानंतर सणासुदीच्या दिवसामध्ये अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या चोरट्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. याच दरम्यान १२ जानेवारी रोजी वरील दोन सोनसाखळी चोर बीड तालुक्यातील नाळवंडी नाका येथे आले असल्याची माहिती खबºयामार्फत मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने त्या दोन सराईत चोरांना तब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असताना महिलेच्या गळ््यातील सोने चोरण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली.तसेच सोनसाखळी चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवल्यावर सणाच्या दिवसात महिलांचे दागिने यापुर्वी चोरी केल्याची देखील कबुली त्यांनी यावेळी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप, जयसिंग वाघ, शेख नसीर, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, कैलास ठोंबरे, सतिष कातखडे, अनिल डोंगरे, शेख अन्वर, संतोष हंगे यांनी केली.महिलांनी सावध राहावेया दोन चोरांना अटक केल्यामुळे सोनसाखळीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दोन्ही चोरांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच महिलांनी देखील सोन्याचे दागिने घातल्यानंतर सावध राहून असा प्रसंग घडू नये यासाठी काळजी घ्यावी, आणि घडल्यास प्रतिकार करावा व तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीPolice Stationपोलीस ठाणे