शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:25 AM

शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. 

अंबाजोगाई (बीड) : शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. 

अंबाजोगाई बसस्थानकाचा थांबा पार करून पुढे निघालेली लातूर - परभणी बस (एमएच २० बीएल १६३३) वरवटी आली असता बस चालकाने अन्य एका वाहनास ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या गंगाखेड - पुणे (एमएच २० बीएल २५२१) बससोबत जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही बसच्या चालक- वाहकासहित ३० प्रवाशी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने दुसऱ्या एका बसमधून आणि रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, लातूर - परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इतर जखमीत तिघे गंभीर असून उर्वरित प्रवाशांना किरकोळ मार आहे. 

बहुतांशी जखमींच्या चेहऱ्याला मार लागला आहे. जखमींमध्ये एस.व्ही आईलवाड (चालक), देवकते बाळासाहेब दिगंबर (वाहक), मनिषा मारोती साळुंके (वाहक), अयोध्या प्रकाश जाधव रा.परळी, पुजा गणपत चव्हाण रा. मोहखेड तांडा, गणपत निवृत्ती चव्हाण रा.मोहखेडा तांडा, ज्ञानेश्वर श्रीनिवास आघाव रा. सारडगाव, ता.परळी, दिलीप दिगांबर कुलकर्णी रा.लातूर, निर्मळकुमार घरमचंद शहा रा.पिंपळवाडा (राजस्थान), शेख पाशामिया आजम रा.वडवळ ता. चाकुर, विठ्ठल अर्जुन मुंडे रा.वानटाकळी, सुंदरराव मोहनराव देशमुख रा. अंबाजोगाई, गोविंद तुकाराम भाकरे रा.वानटाकळी, सुरज बापुराव तरकसे रा. सोनवळा, नारायण बलभीम चौधरी रा.सोनवळा, मनिषा नारायण चौधरी रा. सोनवळा, बालाजी नारायण चौधरी रा.सोनवळा, सुभद्रा धोंडीराम केंद्रे रा. उमराई, विनित मिश्रा रा.हैद्राबाद, प्रमोद महादेव राजमाने रा. परळी, रमेश संतराम सातपुते रा. लातूर, व्यंकटेश मोरे रा.गंगाखेड, खदीर शेख रा. परळी, अजय मधुकर देशमुख रा. परळी, राजनंदीनी धनघाव रा.गंगाखेड, भानुप्रताप रविंद्र सिंग रा. अंबाजोगाई, काशीबाई कराड रा.तांबवा यांचा समावेश आहे. ‘स्वाराती’ प्रशासनाची तत्परताअपघाताची माहिती मिळताच रुग्ण पोहोचण्यापूर्वीच अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार हे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण टीमसह सज्ज झाले होते. जखमींना आणताच तातडीने त्यांच्यावर उपचार झाल्याने अनेकांचा जीव वाचला. अधिष्ठाता आणि अधीक्षक यांच्या देखरेखीखाली डॉ. विजय बुरांडे, डॉ, सुधीर भिसे, डॉ. सतीश गिरेगोईनवाड, डॉ. नितीन चाटे, डॉ. राकेश जाधव, डॉ. अविनाश काशीद, डॉ. अमित लोमटे तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि  सर्व स्टाफने तत्पर उपचारासाठी परिश्रम घेतले. जखमींच्या घरी दूरध्वनीवरून माहिती देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. आपत्तीच्या वेळी नेहमीच स्वारातीमधील स्टाफचे नेहमीचे ‘टीमवर्क’ यावेळेसही पहावयास मिळाले..

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडstate transportएसटी