जिल्ह्यात १२ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ७० नवे रुग्ण आढळून आले तर ५५ जण कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाच्या पाेर्टलवर दोन मृत्यूंची नोंद झाली.
२ हजार ३५० संशयितांची कोरोना चाचणीचे अहवाल १२ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. यामध्ये २ हजार २८० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर, ७० जण बाधित आढळून आले. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ४, आष्टी तालुक्यातील ९, बीड तालुक्यातील २१, धारुर तालुक्यातील ०१, गेवराई तालुक्यातील ०२, केज तालुक्यातील १७, माजलगाव तालुक्यात ३, पाटोदा तालुक्यात ५, शिरुर तालुक्यात ३ तर, वडवणी तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.
दोन मृत्यूची नोंद झाली. यात केज तालुक्यातील येवता येथील ५० वर्षीय पुरुष आणि शिराळा (ता. कळंब जि. उस्मानाबाद) येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या १ लाख १९ हजार ६४ इतकी झाली आहे तर बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ९८ हजार ७०२ इतका आहे. आतापर्यंत २ हजार ७३१ जणांचा बळी गेला असून सध्या ५३१ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
----------------