पाटोदा : तालुक्यातील बीड -नगर महामार्गावर शंभर चिरा पाटीवर राज्य परीवहन महामंडळाच्या बसने दुचाकीस्वारास चिरडले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या घडली. मयत तरुण हा दुचाकीवरून त्याच्या गावी कर्जतला जात होता तर बस आष्टीहून जालण्याकडे जात होती.प्रशांत उर्फ परसराम मोहन अजबे (२४ कुळधरण ता.कर्जत जि.अ.नगर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो बीडच्या खाजगी इंग्रजी शाळेत नोकरीस होता. शनिवारी तो गावी गेला होता. सोमवारी वडिलांची दुचाकी घेऊन तो बीडला आला होता. बेलगाव येथील बहिणीची भेट घेतली. मंगळवारी कर्जत येथे न्यायालयीन कामकाजासाठी तो परत जात होता. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शंभरचिरा फाटा येथे बीडकडे जाणाऱ्या आष्टी-जालना (एमएच २० बीएल २८९८) या बसने वळण घेत असताना समोरून ठोस दिली. यात प्रशांत जागीच ठार झाला.सहायक पोलीस निरीक्षक संजय सहाणे, जमादार तांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली. बसचालक नारायण एकनाथ आंधळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस पोलिसांनी ताब्यात घेतली.प्रशांत हा एकुलता एक मुलगा होता. तो बीडमधील मावसभाऊ पवार यांच्या शाळेत नोकरीस होता. त्यास तीन बहिणी आहेत.या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अंबाजोगाई : विजेच्या धक्क्याने एक ठारअंबाजोगाई तालुक्यातील देवळा शिवारातील शेतात यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरु असताना विजेचा धक्का लागून यंत्रावरील कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली.राकेश कैलास लायकुडे (वय २५, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे त्या कामगाराचे नाव आहे. चुलत्याचे ऊस तोडणी यंत्र घेऊन तो मागील तीन महिन्यापासून बीड जिल्ह्यात वास्तव्यास आहे. देवळा येथील शेतकरी बाळासाहेब पवार यांच्या शेतातील ऊसतोडणीचे काम सध्या राकेशला मिळाले होते.रविवारी दुपारी राकेश ऊसतोडणी यंत्रावर काम करत असताना यंत्राचा विद्युत तारेला धक्का लागला. राकेशने यंत्राला हात लावताच त्यालाही विजेचा जोरदार झटका बसला आणि तो खाली पडला. शेतातील इतर व्यक्तींनी गंभीर जखमी अवस्थेतील राकेशला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे ५.१० वाजता त्याला मयत घोषित करण्यात आले.याप्रकरणी राकेशचे चुलते दिलीप बबनराव लायकुडे यांच्या जवाबावरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दोन अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:05 AM
तालुक्यातील बीड -नगर महामार्गावर शंभर चिरा पाटीवर राज्य परीवहन महामंडळाच्या बसने दुचाकीस्वारास चिरडले.
ठळक मुद्देदुर्घटना : भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडले; पाटोद्यातील प्रकार