बीड : शहरातील भारतरत्न मदर तेरेसा चौकातील पीस ऑफ इडन गार्डनमध्ये (ख्रिश्चन सिमेंट्री) दोन हजार झाडे डौलाने उभी असून, पर्यावरण संवर्धनाबरोबरच येथे ऑक्सिजन पार्क तयार झाले आहे.
अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या पुढाकाराने व सामाजिक वनीकरण, पाटोदा, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व डीएफओ अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट २०२० मध्ये १७०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यानंतर ३०० झाडे लावली. असे दोन हजार झाडे आज या ठिकाणी जीवंत असून, १० ते १५ फूट उंच झाली आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात हा परिसर हिरवागार दिसत असून, या ठिकाणचे वातावरण लक्ष वेधून घेत आहे. या झाडांचे संगोपन करण्यासाठी शिक्षक नितीन शिंदे, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजू जोसेफ, जिल्हा रुग्णालयातील निवृत्त ब्रदर अरुण गायकवाड , निवृत्त एम. आर. आय तज्ज्ञ मारियन रेड्डी, रापमचे लेखाधिकारी किशोर पाटील, जिल्हा बँकेच्या सहायक व्यवस्थापक नीलिमा रामटेके, प्रेमविजय भालतिलक, अतिश काळे, प्रतीक भालतिलक, सुरेश यादव, वनरक्षक स्वाती गिते, उबाळे व अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी कठोर मेहनत घेतली. त्यामुळे ही झाडे दिमाखात बहरत आहेत.
भारतरत्न मदर तेरेसा चौकातील पीस ऑफ इडन गार्डनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी सहायक वनसंरक्षक पाखरे तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे, डी. सी. सी. बँकेच्या मुख्याधिकारी रेखा सिरसठ आदी उपस्थित होते.
===Photopath===
100621\10_2_bed_3_10062021_14.jpeg~100621\10_2_bed_2_10062021_14.jpeg
===Caption===
अल्फा ओमेगा वृक्षारोपण ~अल्फा ओमेगा वृक्षारोपण